बुधवार, 19 अगस्त 2015

शर्मिला ठाकरेंना कुत्र्याचा चावा; चेहऱ्यावर 65 टाके

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना घरातील पाळीव कुत्रा चेहऱ्याला चावल्याची घटना घडली आहे. चेहऱ्यावर 65 टाके घालण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी आज (बुधवार) दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिला ठाकरे यांना घरातील पाळीव कुत्र्याने चावा घेतला आहे. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चेहऱ्यावर तब्बल 65 टाके घालण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ‘कृष्णकुंज‘ या निवासस्थानी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेच्या काही वेळ आधी ही घटना घडली होती. पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरे यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली होती.

दरम्यान, राज ठाकरे यांचे घरातील पाळीव कुत्र्यांवर प्रेम आहे. त्यांच्या घरामध्ये अनेक पाळीव कुत्रे आहेत. यामध्ये ‘पग‘, ‘जर्मन शेफर्ड‘ जातीचे कुत्रे आहेत. ‘बॉण्ड‘ नावाच्या कुत्र्याने शर्मिला ठाकरे यांना चावा घेतल्याचे समजते

मंगलवार, 18 अगस्त 2015

मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने पुरंदरेंसंबंधी वाद- राज

मुंबई- पुरस्कारावरून करण्यात येणार वाद हा भाजपमधील काही मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रचलेले कुभांड आहे. मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने हा वाद निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी केला.
Slow Android Phone? Click Here
भारतीय जनता पक्षामध्ये छुपी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी भाजपचे मंत्री का पुढे आले नाहीत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण‘ देऊ नका असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले होते. त्यावर राज ठाकरे म्हणाले, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर कसे वागावे हे नेमाडे यांनी विंदा करंदीकर, कुसुमाग्रज यांच्याकडून शिकावे. पुरंदरेंना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे काही साहित्यिकांचा पोटशूळ उठला आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात असे वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

...तर राज्यात तांडव करीन
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रमाचे आयोजन अगदी साध्या पद्धतीने करण्यात आले आहे. पुरंदरे यांना संरक्षण पुरेसे संरक्षण देण्यात आलेले नाही हे लक्षात आणून दिले असता राज ठाकरे म्हणाले ‘हे राज्य सरकारचे काम आहे. ते मूग गिळून गप्प बसले आहेत. पण बाबासाहेबांना कुणी हात लावला तर याद राखा